Gold and Silver Rate : दसऱ्यानंतर सोने चांदीचे भाव घसरले,  जाणून घ्या आजचा भाव

rGold and Silver Rate : दसऱ्यानंतर सोने चांदीचे भाव घसरले,  जाणून घ्या आजचा भाव

Gold and silver Rate Today : दिवाळीच्या तोंडावर सोने चांदीच्या दरातील घसरण ही ग्राहकांसाठी दिलासादायक बातमी आहे पण येत्या दिवसांमध्ये सोने चांदीचे दर वाढण्याची सुद्धा शक्यता आहे.

Gold  and Silver Rate Today : नवरात्रीदरम्यान सोने चांदीच्या दरात अनेकदा चढउतार दिसून आला.

त्यानंतर दसऱ्याच्या दिवशी सोने चांदीच्या दरात चांगलीच वाढ दिसून आली होती पण आता दसऱ्यानंतर सोने चांदीच्या दरात घसरण झाली आहे.

जर तुम्ही दिवाळीमध्ये सोने खरेदी करायचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. तुम्ही आजच्या दरामध्ये सोन्याच्या दागिने बुक करू शकता.

दिवाळीच्या तोंडावर सोने चांदीच्या दरातील घसरण ही ग्राहकांसाठी दिलासादायक बातमी आहे पण येत्या दिवसांमध्ये सोने चांदीचे दर वाढण्याची सुद्धा शक्यता आहे.

सोने आणि चांदीचे दर (Gold  and Silver Rate)

बुलियन मार्केट या वेबसाइटनुसार, आज २२ कॅरेटसाठी १० ग्रॅम सोन्याची किंमत ६९,६३९ रुपये आहे तर २४ कॅरेटसाठी ७५,९७० रुपये आहे.

याशिवाय, १० ग्रॅम चांदीची किंमत ९०५ रुपये आहे म्हणजेच चांदी ९०,९५० रुपये प्रति किलोनी विकली जात आहे.

रविवारी चांदीचा दर ९०,३०० रुपये प्रति किलो होता तर १० ग्रॅम सोन्याचा दर ७६,१९० रुपये होता

२४ आणि २२ कॅरेटमध्ये काय फरक आहे?

२४ कॅरेट सोने ९९.९% शुद्ध आहे आणि २२ कॅरेट अंदाजे ९१% शुद्ध असतं. २२ कॅरेट सोन्यात तांबे, चांदी, जस्त

यांसारख्या ९% इतर धातूंचे मिश्रण करून दागिने तयार केले जातात.

२४ कॅरेट सोने शुद्ध असले तरी त्याचे दागिने बनवता येत नाहीत. त्यामुळे बहुतेक दुकानदार २२ कॅरेटमध्ये सोने विकतात.

 

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा

 

सोने खरेदी करताना हॉलमार्क का महत्त्वाचा?

हॉलमार्कचा उद्देश सोन्याची पारदर्शकता तपासणे होय. दागिन्यांमध्ये किती कॅरेट सोन्याचा समावेश आहे हे हॉलमार्कसह लिहिले जाते.

या युनिक कोडद्वारे दागिने शोधणे सोपी होते.सोन्याची पारदर्शकता तपासणे आहे.

१ एप्रिल २०२३ पासून, केंद्र सरकारच्या नवीन नियमानुसार हॉलमार्कशिवाय कोणतेही दागिने बाजारात विकता येत नाहीत.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *