Ladki Bahin Yojana Diwali Payment: लाडक्या बहिणींना दिवाळीपूर्वीच ॲडव्हान्समध्ये मिळणार दोन हफ्ते; अधिकाऱ्यांनी सांगितली तारीख
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी ३० सप्टेंबरपर्यंतच्या मुदतीत २.५२ कोटी महिलांनी अर्ज केले आहेत. त्यातील दोन कोटी ४१ लाख ३५ हजार महिलांचे अर्ज पात्र ठरले असून त्यांच्यासाठी दरमहा ३६२० कोटींची गरज आहे.
आधिक माहितीसाठी येथे क्लिक करा
आतापर्यंत एक कोटी ८५ लाखांहून अधिक महिलांना योजनेचा लाभ मिळाला आहे. विधानसभा आचारसंहितेची शक्यता असल्याने सध्या जुलै-ऑगस्टमध्ये अर्ज केलेल्या पात्र अंदाजे दीड कोटी महिलांना दिवाळीपूर्वीच ऑक्टोबर, नोव्हेंबरचे अॅडव्हान्स हप्ते (प्रत्येकी तीन हजार) दिले जातील, असे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.
विधानसभेची निवडणूक दिवाळीनंतर अपेक्षित असून निवडणुकीची आचारसंहिता जाहीर झाल्यावर योजनेतील लाभार्थीना त्या काळात पैसे द्यायला अडथळा येवू शकतो.
या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून लाडक्या बहिणींना ऑक्टोबर व नोव्हेंबर या दोन महिन्यांचेही दोन हप्ते आताच दिले जात आहेत.
योजना सुरु झाल्यापासून जुलै ते नोव्हेंबर या काळातील साडेसात हजार रुपये मिळाल्याने महिलांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थीना योजना सुरू झाल्यापासून टप्प्याटप्प्याने निधी वितरित केला जात आहे. काही दिवसांत सर्वच पात्र लाभार्थीना योजनेचा लाभ मिळेल. त्यासाठी निधीची व्यवस्था केली असल्याची माहिती, महिला व बालविकास विभागाचे आयुक्त प्रशांत नारनवरे यांनी दिली आहे.