Namo Shetkari Mahasanman Scheme : ‘नमो महासन्मान’च्या पाचव्या हप्त्यासाठी २२५४ कोटी रुपये
राज्यातील विधानसभा निवडणुकांची घोषणा कोणत्याही क्षणी होऊ शकणार आहे त्यामुळे राज्य सरकारने घोषणांचा धडाका लावलेला आहे.
गेल्या महिन्यात ‘नमो शेतकरी महासन्मान’ योजनेचा चौथा हप्ता दिल्यानंतर लगेचच पाचव्या हप्त्याचे वितरण करण्यासाठी २२५४ कोटी ९६ लाख रुपयांच्या निधी वितरणास मान्यता देण्यात आली आहे.
चार दिवसांपूर्वी केंद्रीय निवडणूक आयोगाचा महाराष्ट्र दौरा झाल्यानंतर प्रशासन वेगाने कामाला लागलेले आहेत. तीन वर्षांपेक्षा जास्त काळ झालेल्या अधिकाऱ्यांच्या बदल्या,
गृहजिल्ह्यात ठाण मांडलेले अधिकारी यांच्या याद्या करण्याचे काम चालू आहे आणि, मंगळवारी किंवा शनिवार होण्याची शक्यता आहे.
तसेच जर राज्यातील निवडणुका एका टप्प्यात झाल्या तर १२ किंवा १३ ऑक्टोबर रोजी निवडणुकांची जास्त शक्यता आहे. तर दोन टप्प्यातील निवडणूक असल्यास ७ ऑक्टोबरच्या आत आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे.
त्यामुळे कृषी विभागाने तातडीने पाचवा हप्ता वितरित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
या योजनेतील पहिला, दुसरा, तिसरा आणि चौथा हप्ता सुद्धा वाटप केलेला आहे. मात्र या हप्त्यामध्ये काही शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण आणि अन्य बाबी न झाल्याने ई-केवायसी पूर्ण झाली नव्हती. त्यामुळे त्यातील काही शेतकऱ्यांची ई-केवायसी पूर्ण झाल्याने त्यांनाही हप्ता जमा करण्यात येणार आहे.
ऑगस्ट ते नोव्हेंबर या कालावधीतील पाचव्या हप्त्यासाठी २०१२ कोटी रुपयांच्या निधीची आवश्कता असून, उर्वरित ३०२ कोटींची रक्कम मागील हप्त्यातील प्रलंबित शेतकऱ्यांसाठी वितरित करण्यात येईल.
चौथ्या हप्त्यातील ३९ हेजार ७२९ शेतकऱ्यांच्या खात्यावर दोन हप्ते जमा करण्यात येतील. तसेच एक ते चार हप्त्यांमध्ये पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांना ८४ कोटी ५८ लाख रुपये जमा करण्यात येणार आहेत.