एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री न झाल्यास त्यांच्यासमोर कुठले तीन पर्याय असू शकतात?
एकनाथ शिंदे आणि त्यांच्या शिवसेनेतील आमदार एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व्हावेत यासाठी आग्रही आहेत अशी चर्चा आहे.
त्यांना हे पद मिळालं नाही तर त्यांच्यापुढे काय पर्याय असण्याची शक्यता आहे जाणून घ्या
महाराष्ट्रात महायुतीची सत्ता आली आहे कारण या विधानसभा निवडणुकीत महायुतीला अभूतपूर्व यश मिळालं
आहे. या यशात भाजपाच्या सर्वाधिक १३२ जागा मिळाल्या आहेत. तर एकनाथ शिंदेंच्या
शिवसेनेला ५७ जागा मिळाल्या आहेत आणि अजित पवारांच्या ४१ जागा मिळाल्या आहेत. आता पेच आहे तो
मुख्यमंत्रिपदाचा. मुख्यमंत्री कोण होणार? याच्या विविध चर्चा सुरु आहेत. अजित पवारांनी मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस
यांच्या नावाला आमची हरकत नाही असं म्हटलं आहे. मात्र एकनाथ शिंदे यांनी तसं अनुमोदन
दिलेलं नाही. त्यामुळे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणार की देवेंद्र फडणवीस हा पेच महायुतीमध्ये कायम आहे.
भाजपाकडून एकनाथ शिंदेंची समजूत काढण्याचे प्रयत्न सुरु
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भाजपाकडून एकनाथ शिंदे यांची समजूत काढण्याचा प्रयत्न सुरु आहे. तसंच देवेंद्र
फडणवीस यांचं नाव मुख्यमंत्री म्हणून निश्चित झाल्याचंही समजतं आहे. तसंच एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना
उपमुख्यमंत्रिपद दिलं जाईल अशीही माहिती सूत्रांकडून मिळते आहे. अशात एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले नाहीत तर काय
पर्याय असू शकतात? हे आपण जाणून घेऊ.
केंद्रात एकनाथ शिंदे मंत्री होऊ शकतात
एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले नाहीत तर ते तेव्हाच समाधानी होतील जेव्हा त्यांना त्यापेक्षा मोठी जबाबदारी किंवा
पद मिळेल. त्यामुळे त्यांच्यापुढे केंद्रातल्या सरकारमध्ये मंत्री होण्याचा पर्याय आहे. रामदास आठवले यांनीही हा पर्याय
एकनाथ शिंदे यांना दिला आहे. मध्य प्रदेश पॅटर्न जर भाजपाने वापरला तर शिवराज सिंह चौहान यांच्याप्रमाणे एकनाथ शिंदे
नाही केंद्रात मंत्रिपद दिलं जाऊ शकतं. मोदी सरकार ३.० मध्ये एकनाथ शिंदे मंत्री होऊ शकतात असा एक पर्याय
त्यांच्यासमोर आहे.
एकनाथ शिंदेंपुढचा दुसरा पर्याय काय?
एकनाथ शिंदेंना हा पर्याय मान्य नसेल आणि महाराष्ट्राच्या राजकारणात सक्रिय राहायचं असेल तर त्यांच्यापुढे
उपमुख्यमंत्रिपद स्वीकारण्याचा पर्याय आहे. तसा पर्याय निवडला तर फारसा काही बदल होणार नाही उलट ते सत्तेत
सक्रिय असतील आणि उपमुख्यमंत्री म्हणून जसं देवेंद्र फडणवीस यांनी काम केलं तसंच काम एकनाथ शिंदेही करु
शकतील. याबरोबरच अनेक महत्त्वाची खाती त्यांना त्यांच्याकडे ठेवण्याची संधी या निमित्ताने असेल.
ही बातमी वाचा : | मुख्यमंत्रिपदावरून शिवसेनेची माघार नाही? शंभूराज देसाई म्हणाले, “आम्ही फडणवीसांना सांगितलंय…” |