Gold and silver price today :.देशभरात सध्या सणासुदीचा हंगाम सुरु झाला आहे. नवरात्र उत्सव सणांचा हंगाम सुरु झाला आहे .
या सणासुदीच्या काळात सोन्या चांदीच्या दराला खुप मोठी झळाळी आल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. आज रात्री पुन्हा सोन्याच्या दरात वाढ झाली आहे सोने सुमारे 159 रुपयांनी महागले असून, प्रति 10 ग्रॅम सोन्यासाठी 78,450₹ रुपये मोजावे लागत आहे. हा सोन्याचा आत्तापर्यंतचा विक्री दर आहे. दुसरीकडे या शर्यतीत चांदी देखील मागे नाही. काल देखील चांदीच्या दरात 1035 ₹ रुपयांची वाढ झाली असून. त्यामुळं प्रति किलो चांदीचा दर हा 94,200₹ रुपयांवर पोहोचला आहे.
ज्वेलर्स आणि किरकोळ विक्रेत्यांकडून सोन्याच्या मागणीत प्रचंड वाढऑल इंडिया सराफा असोसिएशनच्या म्हणण्यानुसार, सणासुदीच्या काळात ज्वेलर्स आणि किरकोळ विक्रेत्यांकडून प्रचंड मागणी असल्याने ही वाढ दिसून आली आहे. गुरुवारी सोन्याचा भाव 78,300 रुपये प्रति 10 ग्रम बंद झाला होता. नवरात्रीच्या काळात सोन्या-चांदीच्या मागणीत वाढ झाल्याने दरात ही वाढ होत आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX)वरही डिसेंबर सोन्याचा 131 ₹ रुपयांनी वाढनार आहे . 76375 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले असून . हे देखील त्याच्या सर्वकालीन प्रकारच्या जवळ आहे.सणासुदीच्या हंगामातील मागणीमुळे सोन्याच्या दराने जुना विक्रम मोडला असून .
ऑल इंडिया बुलियन असोसिएशनच्या मते, सणासुदीच्या काळात ज्वेलर्स कडे वाढत्या मागणीमुळे ही वाढ दिसून आली आहे. एमसीएक्सवरही सोन्या-चांदीत वाढ झाली आहे. तसेच पश्चिम आशिया खंडात सुरु असलेल्या युद्धाचा परिणाम झाल्या असुन सोन्या चांदीच्या दरावर झाला आहे. तसेच जागतिक व फेडरल रिझर्व्ह बँकांनी कमी केलेला व्याजदराचा परिणाम देखील सोन्या चांदीच्या भावात तेजी बघायला मिळत आहे.
चांदीचे दर प्रति किलो 1 लाख रुपये होणार का?
चांदीच्या दरातही झपाट्याने वाढ होत आहे. चांदीचे दर हे 1 लाख रुपये प्रति किलोच्या दिशेनं वाटचाल झालेले दिसून येते आहे . सध्या चांदीला देखील मोठी मागणी आहे. आता सणासुदीच्या काळात लोकांच्या मागणीमुळे ज्वेलर्स पेक्षा जास्त खरेदी करत आहेत. एमसीएक्स (मल्टी कमोडिटी एक्स्चेंज) वर डिसेंबर चांदीचे दर 219₹ रुपयांनी वाढून लावले आहे 93,197 ₹ प्रति किलो झाला आहे.