कापूस उत्पादकांसाठी आनंदाची बातमी ! कापसाच्या किंमतीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ !
नमस्कार शेतकरी मित्रांनो, कापुस हंगामाचा विचार केला तर अगदी हंगामाच्या सुरुवातीला कापसाला चांगल्या बाजार भावने सुरुवात झाली होती. कालांतराने अनेक अंतरराष्ट्रीय स्तरावरील बाजारपेठेतील घडामोडीमुळे कापूस दरात सतत घत होऊ लागली.हंगामाच्या सुरुवातीला कापसाचे दर 10 हजार ते 15 हजार या घरात होते,याचा जर आपण विचार केला तर डिसेंबर महिन्याचा शेवटच्या आठवड्यामध्ये कापूस दरात खुप मोठ्या प्रमाणात घट झाली होती.
डिसेंबरच्या शेवटी कापसाचे दराच्या तुलनेत दर 8 हजाराहून देखील कमी झालेले आपल्याला पाहायला मिळाले. या सगळ्या घडामोडीचा विपरित परिणाम हा कापूस पुरवठ्यावर होत असताना दिसून येत आहे. मागील वर्षीच्या आणि या वर्षीच्या दरामध्ये कापसाची तुलना केली तर गेल्या वर्षी पेक्षा या वर्षाचे कापसाचे दर फारच कमी असल्याचे दिसून येत आहे,शेतकऱ्यांना भाव वाढीची अपेक्षा असल्याने शेतकरी कापूस खरेदी व्यापाऱ्यांकडे कापूस विक्री करणे थांबवल्याने कापसाचा पुरवठा सुद्धा विस्कळीत झाला.
परंतू आता अशादायी वातावरण निर्माण झाले असून नवीन वर्षाच्या सुरुवातीला कापूस दरात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून येत आहे.
महाराष्ट्रतील प्रत्येक जिल्ह्यात कापसाचे दर वेगवेगळ्या प्रमाणत वाढले आहेत !
नवीन वर्षातील बाजाराचा पहिलाच दिवस हा कापूस उत्पादकासाठी आनंददायी ठरला. डिसेंबरच्या शेवटच्या 2 दिवसामध्ये कापसाच्या भावात जे काही वाढ झाली ती काल सुध्दा कायम होती. काल सुद्धा अनेक बाजार समिती मध्ये कापसाचे भाव 100 ते 200 रुपयाने वाढले.
डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात कापूस बाजार भावात घट होऊन सरासरी 7000 ते 7500 रुपयापर्यंत घट झाली होती. परंतु शनिवारी म्हणजे आठवड्याच्या शेवटच्या दिवशी कापसाच्या दरात थोडी वाढ होऊन दराची सरासरी ही 7300 ते 8700 पर्यंत पोहोचली. काल सुद्धा कापसाच्या प्रति क्विंटल दरामागे 100 ते 200 रुपयाने वाढ नोंदवण्यात आली.