Government Job : इंडिया पोस्ट पेमेंट बँकेत नोकरीची सुवर्णसंधी; ३४४ रिक्त जागा; पात्रता अन् पगार किती? जाणून घ्या
सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे.
इंडिया पोस्ट पेमेंट बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे.
एक्झिक्युटिव्ह पदासाठी ही भरती केली जाणार आहे. त्यामुळे नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांनी या नोकरीसाठी लवकरात लवकर अर्ज करावेत.
इंडियन पोस्ट पेमेंट बँकेत ३४४ रिक्त पदांसाठी ही भरती करण्यात येणार आहे.
आधिक माहितीसाठी येथे क्लिक करा
या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ ऑक्टोबर २०२४ आहे.
याबाबत अधिकृत वेबसाइटवर जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.
इंडियन पोस्ट पेमेंट बँकेतील या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांने कोणत्याही शाखेतून पदवीधर असणे गरजेचे
आहे.
त्याचसोबत GDS म्हणून कामाचा दोन वर्षाचा अनुभव असायला हवा.त्यामुळे ज्या उमेदवारांनी याआधी पोस्ट ऑफिसमध्ये काम केले आहे त्यांच्यासाठी ही चांगली संधी आहे.
या नोकरीसाठी तुम्हाला ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्यासाठी तुम्हाला ७५० रुपये शुल्क भरावे लागणार आहे.
या नोकरीसाठी निवड झालेल्या उमेदवारांना ३०,००० रुपये मासिक वेतन मिळणार आहे.
या नोकरीसाठी अर्ज करण्याची सुरुवात ११ ऑक्टोबर २०२४ पासून झाली आहे. दरम्यान अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ ऑक्टोबर २०२४ आहे.
अन्न व औषध प्रशासन विभाग भरती
याचसोबत सध्या राज्याच्या अन्न व औषध प्रशासन विभागात नोकरी करण्याची चांगली संधी आहे.
५६ पदांसाठी ही भरती केली जाणार .
सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी ही चांगली संधी आहे.
या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २२ ऑक्टोबर २०२४ आहे.