Headlines

​​​​​​​Jio Diwali Dhamaka Offer : Jio युजर्सना दिवाळी गिफ्ट! 3350 रुपयांचा मोफत लाभ, जाणून घ्या सविस्तर…

​​​​​​​Jio Diwali Dhamaka Offer : Jio युजर्सना दिवाळी गिफ्ट! 3350 रुपयांचा मोफत लाभ, जाणून घ्या सविस्तर…

​​​​​​​Jio Diwali Dhamaka Offer : रिलायन्स जिओच्या दिवाळी ऑफर अंतर्गत तुम्हाला 3350 रुपयांचा फायदा

मिळत आहे. दरम्यान, या प्लॅनबाबत सविस्तर जाणून घ्या…

Jio Diwali Dhamaka Offer : मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांची टेलिकॉम कंपनी रिलायन्स

जिओने (Reliance Jio ) युजर्ससाठी दिवाळी धमाका ऑफर आणली आहे. कंपनीची ही ऑफर 90 दिवस आणि

365 दिवसांच्या जिओ प्लॅनसोबत दिली जात आहे. रिलायन्स जिओच्या दिवाळी ऑफर अंतर्गत तुम्हाला 3350 रुपयांचा

फायदा मिळत आहे. दरम्यान, या प्लॅनबाबत सविस्तर जाणून घ्या…

‘या’ प्लॅनसोबत ऑफरचा फायदाजर तुमच्याकडे रिलायन्स जिओचे प्रीपेड सिम असेल तर तुम्हाला जिओ 899 प्लॅन

आणि जिओ 3599 प्लॅनसह ऑफरचा लाभ मिळेल. या प्लॅनसह फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्म, ट्रॅव्हल पोर्टल आणि

ऑनलाइन शॉपिंग वेबसाइट्ससाठी कूपन उपलब्ध असतील. या दोन्ही प्लॅनसह 3,000 रुपयांचे EaseMyTrip, 200

रुपयांचे AJIO आणि 150 रुपयांचे स्विगी व्हाउचर दिले जात आहेत.

तुम्ही EaseMyTrip चे 3,000 रुपयांचे व्हाउचर फ्लाइट आणि हॉटेल बुकिंगसाठी वापरू शकता. AJIO कडून नवीन

कपडे खरेदी करताना, तुम्ही 200 रुपयांचे व्हाउचर लागू करून बचत करू शकता. याशिवाय, तुम्ही स्विगीवरून खाद्यपदार्थ

ऑर्डर केल्यास 150 रुपयांचे कूपन वापरून पैसे वाचवू शकता.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा

जिओ 899 प्लॅन…899 रुपयांच्या या प्लॅनमध्ये युजर्सना ट्रु अनलिमिटेड 5G डेटा, दररोज 100 एसएमएस, फ्री कॉलिंग,

दररोज 2 GB डेटा आणि 90 दिवसांच्या व्हॅलिडिटीसह 20 GB अतिरिक्त डेटा दिला जात आहे.

जिओ 3599 प्लॅन…3599 रुपयांच्या या प्लॅनमध्ये तुम्हाला 365 दिवसांच्या व्हॅलिडिटीसह 2.5 GB डेटा, अनलिमिटेड

कॉलिंग, 100 मोफत एसएमएस दररोज मिळतील. तसचे, दोन्ही प्रीपेड प्लॅनसह, तुम्हाला Jio Cinema, Jio TV

आणि Jio Cloud चे फ्री अॅक्सेस देखील मिळेल.

रिचार्ज केल्यानंतर कूपन कसे मिळवायचे?

दरम्यान, रिचार्ज केल्यानंतर, MyJio ॲप ओपन करा आणि My Offers सेक्शनमध्ये जा. यानंतर My Winnings

ऑप्शनवर क्लिक करा. येथे तुम्हाला तिन्ही कंपन्यांचे व्हाउचर कोड दिसतील, जे तुम्ही कॉपी करू शकता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *