Headlines

Onion Market maharashtra : महाराष्ट्र बाजार समितीत कांद्याची आवक वाढली,

Onion Market maharashtra : महाराष्ट्र  बाजार समितीत कांद्याची आवक वाढली, जुन्या कांद्याच्या दरात घसरण

कांद्याची आवक वाढली, जुन्या कांद्याच्या दरात घसरण

maharashtra Onion Rate : महाराष्ट्रातात जुन्या कांद्याला चांगला भाव मिळत आहे. मागच्या दोन दिवसांत

सोलापूर बाजारसमितीत ६५४ वाहनांच्या कांद्याची आवक झाली आहे.

यामुळे जुन्या कांद्याला प्रतिक्विंटल ३ हजार ते ५ हजार रुपयांपर्यंत भाव मिळाला आहे.

तर नवीन कांद्याला सोलापूर बाजार समितीत मंगळवारी (ता. ०८) २ ते ४ हजारांपर्यंत दर होता.

पावसाने भिजलेल्या कांद्याला प्रतिकिलो १० ते १५ रुपयांचा दर मिळाला.

सोलापूर बाजार समितीत नगर, नाशिक, धाराशिव, पुणे जिल्ह्यातून जुन्या कांद्याची आवक होत आहे.

मागच्या दोन दिवसांत आवक झालेल्या ३२५ वाहनांपैकी २०० वाहने जुना कांदा होता.

तर १२५ वाहनांमध्ये नवीन कांद्याची आवक झाली होता.

म्हसवड, फलटण, माळशिरस, कर्नाटक, बागलकोट, विजयपूर, कलबुर्गी येथून नवीन कांदा सोलापूर बाजार समितीत विक्रीसाठी येत आहे.

आधिक माहितीसाठी येथे क्लिक करा

 

आवक वाढल्याने दरात काहीशी घसरण झाली आहे. ५ हजार ५०० रुपये क्विंटलने जाणारा कांदा आता आवक वाढल्याने ३ ते ४ हजार रुपयांपर्यंत विकला जातोय.

सोलापूर जिल्ह्यातील नवीन कांदा बाजारात यायला अजून एक महिन्याचा अवधी आहे.

तत्पूर्वी, दर कमी झाल्याने बळिराजाची चिंता वाढू लागली आहे.

त्यातच पुन्हा शेतकऱ्याला विकलेल्या कांद्याचे बिल रोखीने मिळत नाही

किमान १५ हजार रुपयांपेक्षा जास्त बिल झाल्यास त्यांना १५ दिवसांची तारीख टाकलेला धनादेश (चेक) दिला जात असल्याची खंत तेथील कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी व्यक्त केली.

आधिक माहितीसाठी येथे क्लिक करा

सद्या नवीन कांद्याला सोलापूर बाजार समितीत प्रतिक्विंटल कमाल दर ३ हजार ५०० रुपये ते ४ हजार रुपये तर सरासरी दर २ हजार रुपये आहे.

आगामी काळात कांद्याची आवक वाढली तरी देखील कांद्याचे दर तेजीत राहतील असा अंदाज बाजार समितीतील अधिकाऱ्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *