PM Kusum Yojana : सोलार अनुदानाला पुन्हा एकदा सुरवात.

PK Kusum Yojana : पीएम कुसुम योजनेचा शेतकऱ्यांना काय फायदा ?

पीएम कुसुम योजनेचा लाभ घेण्यासाठी नेमका अर्ज कुठे करायचा ? हे जाणून घेणं महत्वाचं आहे.

मुंबई: केंद्र सरकारनं देशातील शेतकऱ्यांसाठी सौर पंप आणि ग्रीड कनेक्टेड सौर आणि इतर नवीकरणीय उर्जा संयत्र स्थापित करण्यासाठी प्रधानमंत्रीॉ किसान उर्जा व उत्थान महा अभियान म्हणजेच पीएम कुसुम योजना सुरु केली आहे. पीएम कुसुम योजनेमध्ये 3 एचपी, 5 एचपी आणि 7.5 एचपी क्षमेतेचे सौर पंप स्थापित करण्यात येणार आहेत. महाराष्ट्रात जवळपास 1 लाख सौर पंप स्थापित करण्यास केंद्र शासनानं मान्यता दिली आहे. पीएम कुसुम योजनेचा लाभ घेण्यासाठी नेमका अर्ज कुठे करायचा? हे जाणून घेणं महत्वाचं आहे.

पीएम-कुसुम योजनेतून सौर पंप घेण्यासाठी अर्ज कुठे करायचा ?

पीएम कुसुम योजनेअंतर्गत सौर आणि इतर नूतनीकरणक्षम क्षमता जोडण्याचं उद्दीष्ठ आहे. महाराष्ट्रात पीएम कुसुम योजनेचा लाभ घेण्यासाठी महावितरणच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन अर्ज करता येईल.

अर्ज करण्यासाठी

👇👇👇👇

येथेक्लिक करा

हा अर्ज भरण्यसाठी शेतकऱ्यांकडे ही कागदपत्रे असणे आवश्यक आहे !

आधारकार्ड, जमिनीचा उतारा, पाण्याचा स्त्रोत, बँक खाते पासबूक झेरॉक्स लागणार आहे. शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेण्यासाठी 10 टक्के खर्च करावा लागेल. एससी आणि एसटीच्या शेतकऱ्यांसाठी 5 टक्के खर्च करणं आवश्यक आहे. जलसंपदा विभाग, किंवा जलसंधारण विभागाचं पाणी उपलब्धतेबद्दलचं प्रमाणपत्र आवश्यक आहे.

कुसुम योजनेची सुरुवात कधी झाली ?

कुसुम योजनेची घोषणा सन 2018-19 च्या अर्थसंकल्पात तत्कालीन अर्थमंत्री अरुण जेटली यांनी घोषणा केली होती. भारतातील मोसमी पाऊस, वीजेची कमतरता, जलसिंचन सुविधांच्या कमतरतांमुळे शेतकऱ्यांना पिकांना पाणी देण शक्य होत नाही. ही अडचण दूर करण्यासाठी केंद्र सरकारनं कुसुम योजना आणली होती. कमी पावसामुळे आणि वीज नसल्यानं शेतकऱ्यांच्या पिकांचं नुकसान होतं. शेतकरी केंद्र सरकारच्या या योजनेद्वारे त्यांच्या जमिनीवर सौर उर्जेचे पॅनेल आणि पंप लावून शेतीला पाणी देता येणार आहे. कुसुम योजनेअंतर्गत आतापर्यंत 20 लाख सौर पंप शेतकऱ्यांना दिले गेल्याची माहिती राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु होताना दिली होती.

जाणून घ्या काय आहेत वैशिष्ठे

👇👇👇👇

 येथे क्लिक करा

सरकारला  देखील होणार  फायदा !

कुसुम योजनेद्वारे शेतकरी त्यांच्या जमिनीवर सोलर पॅनेल लावू शकतात. याद्वारे निर्माण होणाऱ्या वीजेचा वापर करुन शेतीला पाणी दिले जाऊ शकते. शेतकरी सोलर पॅनेल द्वारे तयार झालेली वीज गावातही वापरू शकतात.यामुळे सरकार आणि शेतकऱ्यांना फायदा होणार आहे.सिंचनासाठी शेतकऱ्यांना मोफत वीज मिळेल आणि अतिरिक्त वीज तयार झाल्यास तिचे ग्रीड बनवून ती वीज कंपन्यांना दिल्यास त्यांचा फायदा होऊ शकतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *