Kanda chal yojana आसा ऑनलाइन फॉर्म भरून घ्या.

Kanda Chal Anudan Yojana 2023
नमस्कार शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रात कांद्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. सर्वसाधारणपणे शेतकरी कांदा जमिनीवर पसरून किंवा स्थानि रीत्या तयार केलेल्या चाळीमध्ये कांदा पिकाची साठवणूक करतात. त्यामुळे कांदा मोठ्या प्रमाणावर नसतो आणि त्याचे नुकसान होते. तसेच कांद्याची प्रत आणि टिकाऊपणा यावर देखील त्याचा विपरीत परिणाम होतो. कांदा चाळीच्या उभारणीमुळे कांद्याची प्रत राखली जाते आणि तो कांदा दीर्घकाळ टिकवला जाऊ शकतो. त्यामुळे शेतकऱ्याला त्याचा अधिक नफा मिळू शकतो. त्यामुळेच कांदाचाळ उभारणी कडे शेतकऱ्याचा कल हा वाढत झालेला दिसून येतो.

कांदा चाळ अनुदान योजना ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.

👇👇👇

येथे क्लिक करा.

कांदा चाळ अनुदान किती?
कांदा चाळीसाठी शासनाकडून आर्थिक सहाय्य म्हणून ५, १०, १५, २० व २५ मेट्रिक टन क्षमतेच्या कांदा चाळ उभारणीसाठी येणाऱ्या खर्चाच्या ५०% व कमाल ३,५००/- रुपये प्रति मेट्रिक टन या क्षमतेनुसार अर्थसहाय्य दिले जाते.

कांदा चाळ अनुदानाचे उद्दिष्ट काय?
कांदा चाळ उभारल्याने शेतकर्‍याला कांद्याच्या साठवणुकीत नुकसान कमी होईल आणि अधिक नफा मिळवता येईल.
हंगामानुसार कांद्याची आवक वाढून कांद्याचे भाव कोसळतात तसेच हंगामा व्यतिरिक्त कांद्याचा तुटवडा पडून कांद्याचे भाव अतिशय मोठ्या प्रमाणावर वाढतात. अशा समस्येवर अंशतः नियंत्रण मिळवणे.
कांद्याची साठवणूक करून अधिक नफा मिळवणे

कांदा चाळ अनुदान योजना ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.

👇👇👇

येथे क्लिक करा.

कांदा चाळ अनुदान पात्रता

या अनुदान योजनेअंतर्गत अर्ज करताना शेतकऱ्याच्या अर्जदार शेतकऱ्याच्या स्वतःच्या मालकीची जमीन असणे बंधनकारक आहे.
७/१२ उतारा वर नोंद असणे आवश्यक आहे.
अर्जदार शेतकऱ्याकडे कांदा पीक असणे गरजेचे आहे.
कांदा चाळ अनुदान लाभ कोण घेऊ शकतो?
वैयक्तिक कांदा उत्पादक शेतकरी
शेतकऱ्यांचा गट स्वयंसहाय्यता गट
शेतकरी महिला गट
शेतकऱ्यांची उत्पादक संघ
नोंदणीकृत शेती संबंधित संस्था
शेतकऱ्यांच्या सहकारी संस्था
सहकारी पणन संघ

आवश्यक कागदपत्रे –

सातबारा उतारा
आधार कार्डची छायांकित प्रत
आधार संलग्न बँक खात्याच्या पासबुकाच्या प्रथम पानाची छायांकित प्रत
संवर्ग प्रमाणपत्र (अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमाती शेतकऱ्यांसाठी)
विहित नमुन्यातील हमीपत्र (प्रपत्र २)
अर्ज कुठे करायचा
या अनुदान योजनेअंतर्गत लाभ घेऊ इच्छिणाऱ्या आणि पात्र अर्जदारांनी या योजनेसाठी हॉर्टनेट (http://www.hortnet.gov.in) या ऑनलाइन संकेतस्थळावर रजिस्ट्रेशन करावे.

 

कांदा चाळ अनुदान योजना ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.

👇👇👇

येथे क्लिक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *