Headlines

Maharashtra Vidhan Sabha Result 2024: विधानसभेच्या निकालापूर्वी महायुतीने ‘प्लॅन बी’ आखला, बहुमत मिळालं नाही तर…..

Maharashtra Vidhan Sabha Result 2024: विधानसभेच्या निकालापूर्वी महायुतीने ‘प्लॅन बी’ आखला, बहुमत मिळालं नाही तर…..

maharashtra vidhan sabha election Result 2024: राज्यातील विधानसभा निवडणुकीचा

निकाल जाहीर होण्यास अवघे काही तास शिल्लक, महायुतीचे नेते सक्रिय

मुंबई: राज्यातील विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होण्यासाठी आता अवघे काही तास शिल्लक राहिले आहेत.

शनिवारी सकाळी 8 वाजता राज्यातील सर्व मतदारसंघांमध्ये मतमोजणीला सुरुवात होईल. या पार्श्वभूमीवर महायुतीच्या

(Mahayuti) गोटात हालचालींना सुरुवात झाली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, एक्झिट पोलचे निकाल

(Maharashtra Exit Poll 2024) समोर आल्यानंतर महायुतीने प्लॅन बी आखल्याची माहिती समोर

विधानसभा निवडणुकीत बहुमतापासून दूर राहिल्यास महायुतीने छोट्याछोट्या पक्षांची मोट बांधायची रणनीती

आखली आहे. जे पक्ष महायुतीत नाहीत, अशांशी संपर्क साधला जात आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आम्ही

कोणत्याही अपक्षांच्या संपर्कात नसल्याचे गुरुवारी सांगितले होते. मात्र, महायुतीच्या गोटातून अपक्ष आणि बंडखोरांनी

संपर्क साधण्यास सुरुवात झाल्याची माहिती आहे. महायुतीचे नेते छोट्या घटकपक्षांशी बोलणी करत आहेत. केंद्रात

भाजपचे सरकार आहे. त्यामुळे आता राज्यात सत्तेतील वाटा देऊन घटक पक्षांना जवळ करण्याचा भाजपचा प्रयत्न

असल्याची माहिती आहे.

हे पण वाचा : crop insurance money : 75% पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यावर या दिवशी जमा crop

निकालापूर्वी ठाकरे गट सावध

विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीसाठी शिवसेना ठाकरे गटाकडून विशेष खबरदारी घेतली जाणार आहे. उद्धव ठाकरे

यांनी ठाकरे गटाच्या उमेदवारांशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधल्याचे समजते. मतमोजणीवेळी उमेदवारांच्या

प्रतिनिधींनी तसंच उमेदवारांनी काय काळजी घ्यावी, यासंदर्भात उद्धव ठाकरे आणि तज्ञांनी उमेदवार आणि

प्रमुखांना मार्गदर्शन केल्याचे समजते.

टपाली आणि EVM मधील मतमोजणीसंदर्भातील बारकावे, कोणत्या वेळी आक्षेप घ्यावेत, लेखी तक्रार याविषयी

कालच्या बैठकीत मार्गदर्शन करण्यात आल्याचे समजते. लोकसभा निवडणुकीतील उत्तर पश्चिम मुंबई मतदार संघात

झालेल्या प्रकारची पुनरावृत्ती होऊ नये,यासाठी उद्धव ठाकरे आणि पक्षाकडून खबरदारी घेतली जात आहे.

निकालानंतर 12 तासांमध्ये मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर करणार: वडेट्टीवार

राज्यात महाविकास आघाडीची सत्ता येणार आहे. आम्हाला कोणतीही जुळवाजुळव करावी लागू शकणार नाही.

सत्तास्थापनेत आम्हाला कोणतीही अडचण होणार नाही, असे वक्तव्य काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी केले. तर

विजय वडेट्टीवार यांनी आम्ही निकालानंतर 12 तासांत मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर करु, असे सांगितले.

राज्यात यंदा मतदानाचा टक्का वाढला आहे. लोकसभा निवडणुकीत राज्यात 61 टक्के मतदान झाले होते. मात्र,

अवघ्या सहा महिन्यांनी झालेल्या विधानसभा निवडणुकीत राज्यात तब्बल 66 टक्के मतदान झाले आहे. या वाढलेल्या

मतदानाचा फायदा कोणाला होणार, यावर या निवडणुकीचा अवलंबून असेल. त्यामुळे आता उद्या काय घडणार, याकडे

सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

हे पण वाचा : cotton soybean subsidy  : कापूस सोयाबीन अनुदान मिळाले का? आत्ताच पहा यादीत तुमचे नाव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *