Maharashtra Vidhan Sabha Election Exit Poll: विधानसभा निवडणुकीचा आणखी एक एक्झिट पोलचा निकाल, महाविकास आघाडीसाठी आनंदाची बातमी
maharashtra vidhan sabha election Results 2024: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा
आणखी एक धक्कादायक एक्झिट पोल. यंदा 30 वर्षातील मतदानाचा विक्रम मोडीत निघाला आहे.
मुंबई: राज्यातील विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरु होण्यासाठी आता अवघे 24 तास शिल्लक राहिले आहेत. या
पार्श्वभूमीवर सध्या विविध संस्थांच्या एक्झिट पोल्सची (Maharashtra Elections 2024) चर्चा सुरु आहे.
मतदान संपल्यानंतर म्हणजे 20 नोव्हेंबरला काही संस्थांचे एक्झिट पोल्स जाहीर झाले होते. यापैकी बहुतांश एक्झिट
पोल्समध्ये महायुतीची सरशी होताना दिसत होती. मात्र, गुरुवारी जाहीर झालेल्या प्रजातंत्रच्या एक्झिट पोलमध्ये
(Prajatantra exit poll) महायुतीची सरशी होताना दिसत आहे. या एक्झिट पोलनुसार यंदाच्या विधानसभा
निवडणुकीत महाविकास आघाडीला 149 जागांवर विजय मिळले. तर महायुतीला फक्त 127 जागांवर समाधान मानावे
लागू शकते. त्यामुळे प्रजातंत्रच्या एक्झिट पोलनुसार महाविकास आघाडी बहुमतासाठी लागणारा 145 जागांचा
आकडा पार करुन सरकार स्थापन करु शकते.
प्रजातंत्रच्या एक्झिट पोलचा सविस्तर अंदाज खालीलप्रमाणे
महाविकास आघाडीला 149 जागांवर विजय मिळेल. यामध्ये मराठवाड्यातील 30, मुंबईत 18, उत्तर महाराष्ट्रात 23, ठाणे
आणि कोकणात 17, विदर्भात 31 आणि पश्चिम महाराष्ट्रातील 30 जागांचा समावेश आहे.
महायुतीचा विजय कुठे-कुठे होणार?
प्रजातंत्रच्या एक्झिट पोलनुसार महायुतीला राज्यातील 288 पैकी 127 विधानसभा मतदारसंघात विजय मिळेल. तसे
घडल्यास भाजप अपक्ष आणि बंडखोरांच्या मदतीने 145 ची मॅजिक फिगर गाठण्याची कसरत करणार का आणि त्यामुळे
घोडेबाजार होणार का, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
महायुतीला कुठे किती जागांवर विजय मिळणार?
मराठवाड्यात 15 जागा मिळतील
मुंबईत 18 जागा मिळतील
उत्तर महाराष्ट्र 21 जागा मिळतील
ठाणे-कोकण 18 जागा मिळतील
विदर्भ 29 जागा मिळतील
पश्चिम महाराष्ट्र 26 जागा मिळतील
राज्यात मतदानाचा टक्का वाढला
यंदाच्या विधानसभा निवडणुकीत गेल्या 30 वर्षांमधील मतदानाचा विक्रम मोडीत निघाला आहे. लोकसभा
निवडणुकीत तब्बल 61 टक्के मतदान झाले होते. परंतु, विधानसभा निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढला आहे.
अंतिम आकडेवारीनुसार यंदा राज्यभरात सरासरी 66.05 टक्के मतदान झाले. हे वाढलेले मतदान कोणासाठी
फायदेशीर ठरणार, याची उत्सुकता सर्वांना लागली आहे. साधारणत: एखाद्या निवडणुकीत मतदानचा टक्का वाढल्यास
तो प्रस्थापितविरोधी कल मानला जातो. मात्र, यंदा महाराष्ट्रात वाढलेले मतदान हे लाडकी बहीण योजनेचे यश असल्याचा
दावा सत्ताधारी महायुतीकडून केला जात आहे. अनेक बड्या नेत्यांच्या मतदारसंघात मतदानाचा टक्का वाढला आहे.
राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूरच्या कागल मतदारसंघात झाले. याठिकाणी तब्बल 81 टक्के मतदारांनी मतदानाचा
हक्क बजावला आहे. तर मुंबईत सर्वाधिक कमी म्हणजे 52 टक्क्यां
च्या आसपास मतदान झाले.
हे नक्की वाचा : | Maharashtra Vidhan Sabha Result 2024: विधानसभेच्या निकालापूर्वी महायुतीने ‘प्लॅन बी’ आखला, बहुमत मिळालं नाही तर….. |