Maharashtra Exit Poll : महायुतीची झोप उडवणारा ‘पोल समोर, सोशल मीडियावर लोकांचा मूड काय?
Social Media Exit Poll : अनेक माध्यमांचे एक्झिट पोल महायुतीच्या बाजूने झुकणारे असले तरी सोशल मीडियावर मात्र लोकांचा मूड वेगळाच असल्याचं दिसतंय.
Media Exit Pol
मुंबई : महाराष्ट्राच्या महानिकालाला अवघा काहीच वेळ शिल्लक असताना आता सोशल मीडियावर त्या संदर्भात वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. निकालाच्या दिवशी आलेल्या एक्झिट पोलमुळे अनेकांची झोप उडाल्याचं दिसून आलं. आता तशीच झोप एबीपी माझाच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर घेण्यात आलेल्या पोलमुळे उडू शकते असं दिसतंय. एबीपी माझाच्या सोशल मीडियावर घेण्यात आलेल्या पोलमधून ( Social Media Exit Poll) बहुसंख्य लोकांनी राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत येईल असा विश्वास व्यक्त केला आहे.
Facebook वर लोकांचा कल काय?
फेसबूकवर एकूण 1024 लोकांनी आपला कल नोंदवला असून त्यापैकी 52 टक्के लोकांनी महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत येईल असं म्हटलंय. तर 41 टक्के लोकांना महायुती सरकार सत्तेत येणार असं सांगितलं. सात टक्के लोकांना राज्यात त्रिशंकू स्थिती निर्माण होईल असं वाटतंय.
महायुती : 41%
महाविकास आघाडी : 52%
त्रिशंकू : 7%
एकूण मतं : 1024
YouTube वर लोकांचा कल काय?
यूट्यूबवर आतापर्यंत 2 लाख 32 हजार लोकांनी आपला कल नोंदवला. त्यापैकी 63 टक्के लोकांनी महाविकास आघाडीची सत्ता येणार असल्याचं सांगितलं. तर 32 टक्के लोकांनी महायुती सरकार सत्तेत येणार असं सांगितलं. उर्वरित पाच टक्के लोकांनी राज्यात त्रिशंकू अवस्था निर्माण होईल असं सांगितलं.
महायुती : 32%
महाविकास आघाडी : 63%
त्रिशंकू : 5%
एकूण मतं : 232K
Instagram वर लोकांचा कल काय?
इन्स्टाग्रामवर मात्र याच्या विरोधात कल असल्याचं दिसून आलं. इन्स्टाग्रामवर 22 हजार 714 लोकांनी आपला कल
नोंदवला असून 49 लोकांनी राज्यात महायुतीचं सरकार सत्तेत येणार असल्याचं सांगितलं. तर 44 टक्के लोकांनी
महाविकास आघाडी सरकार येईल असं सांगितलं. सात टक्के लोकांना राज्यात त्रिशंकू स्थिती निर्माण होईल असा कल
नोंदवला.
महायुती : 49%
महाविकास आघाडी : 44%
त्रिशंकू : 7%
एकूण मतं : 22,714
ही बातमी वाचा : | विधानसभा निवडणुकीचा आणखी एक एक्झिट पोलचा निकाल, महाविकास आघाडीसाठी आनंदाची बातमी |